बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात पुन्हा भेट; नव्या चर्चांना उधाण

नवी दिल्ली | प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. सिल्वर ओकवर चाललेल्या 3 तासाच्या या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या या अचानक भेटीमुळे राजकिय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. पण आता 10 दिवसात या दोघांमध्ये पुन्हा भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शरद पवार दिल्लीत गेले असून ते विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांना भेटणार आहेत. प्रकृती व्यवस्थित झाल्यानं त्यांनी लांबवलेली दिल्ली भेट आता केली आहे. यातून कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढू नये, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. मात्र शरद पवार फक्त विरोधीपक्षातील नेत्यांशी चर्चा करणार असल्यानं राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे.

दिल्लीत पोहचताच शरद पवार यांनी राजकीय भेटीगाठी घेण्यास सुरवात केली आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात भेट झाली आहे. पवार दिल्लीत तीनचार दिवस राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज ते राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठकही करणार आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह केरळातील काही नेतेही उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्याचवेळी प्रशांत किशोर पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी भेटीला दाखल झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, भाजपला लोकसभा निवडणुकीत 400 जागांवर मात देता येऊ शकत असल्याचं किशोर यांनी त्या भेटीत दाखवून दिलं होतं. त्या जागा कोणत्या, कोणत्या राज्यात किती आहेत, त्या राज्यात कोणते प्रादेशिक पक्ष मोठी भूमिका बजावू शकतात, याची आकडेवारी प्रशांत किशोर यांनी पवारांना दिली होती.

थोडक्यात बातम्या-

पुन्हा युती होऊ शकते, प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातलं बोलले- गिरीश बापट

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- विजय वडेट्टीवार

“मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही”

“आम्ही वाघाच्या काळजाचे, शिवसेना प्रताप सरनाईकांच्या पाठिशी ठाम उभी”

“एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, पण शिवसेनेला हात लावायचं नाही हे ठरलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More