बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता!

पुणे | राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडचाही समावेश आहे. या निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. अशात  आगामी महापालिका निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवारांनी काही भाजप नगरसेवक संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वाखाली लढली जाणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलंय. तसेच पुण्यातले भाजपचे काही नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा देखील अजित पवारांनी केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळातील घडामोडींना मात्र चांगलाच वेग आला आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढली जामार आहे. पुण्यातील काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मात्र, मी खालच्या पातळीचं राजकारण करत नाही. भाजपच्या अनेक नगरसेवकांना आम्ही संधी दिली आहे, असं अजित पवार म्हणाले. पालिका हाती असल्यास चांगलं काम होतं, असं अजित पवारांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

‘वयाची 50 वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलंय’; अजित पवारांचा काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला टोला

‘या’ ठिकाणी ट्रक चालकांना मिळतो तब्बल 70 लाख पगार!

‘अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता, कट्टरतावाद कायम राहिला तर…’;, नरेंद्र मोदींनी तालिबानचे सांगितले धोके

आनंदाची बातमी! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More