“वीर सावरकरांच्या नावानं राजकारण आणि आज सत्तेसाठी आंधळेपणा”
मुंबई | राज्यात दसरा मोठ्या उत्साहात साजरा झाला. आपल्या राज्यात राजकीय दसरा सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजप आणि शिवसेना यांची 25 वर्षांची युती महाविकास आघाडीच्या स्थापनेनं तुटल्यापासून या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून दोन्ही पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करतात. आताही फडणवीस यांनी सावरकरांचा दाखला देत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
वीर सावरकरांच्या नावानं राजकारण आणि आज सत्तेसाठी आंधळेपणा, या शब्दात फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. परिणामी भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा सावरकरांच्या मुद्द्यावरून चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाच्या मुद्दयावरून आधीच दोन्ही पक्षांत सतत कलगीतूरा रंगलेला असतो. आता त्यात सावरकरांच्या मुद्द्याचा समावेश झाला आहे.
दरम्यान, कोरोना महामारीचा दाखला देत शिवसेनेनं आपला पारंपारिक दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कवर न भरवता षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला होता. या मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यातील राजकारण चांगलंच पेटलेलं आहे.
वीर सावरकरांच्या नावाने राजकारण आणि आज सत्तेसाठी अंधळेपणा!
(मराठी कट्टा । मुंबई । दि. 11 ऑक्टोबर 2021)https://t.co/2GMmxZ2csC #Savarkar #VeerSavarkar #सावरकर #SwatantyaveerSavarkar pic.twitter.com/y1AKisiDs7
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 18, 2021
थोडक्यात बातम्या
कामगार मंत्री हसन मुश्रीफांच्या घरावर काढणार 50 हजार कामगारांचा मोर्चा
आरोग्य विभागाच्या वादात मंत्री बच्चू कडू यांची उडी, राज्य सरकारला दिला घरचा आहेर
बाबा राम रहीमसह अन्य पाच साथीदारांना न्यायालयानं ठोठावली ‘ही’ मोठी शिक्षा
Comments are closed.