बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील, त्यांची मंत्रीपदावरून कधी हकालपट्टी करणार?”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण विविध मुद्द्यावरून तापलेलं दिसतंय. जळगावमधील प्रचारसभेत शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता गुलाबराव पाटील यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अशातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

“शिवसेनेच्या नेत्यांना झालंय काय? संजय राऊतानंतर आता गुलाबराव पाटील त्यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं आहे. गुलाबराव पाटील-रांझ्याचा पाटील वृत्ती तीच आहे. महाराजांनी त्याची पाटीलकी काढून घेतली. मग आता गुलाबरावाची मंत्रीपदावरून हकालपट्टी कधी होणार?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

जळगावमधील प्रचारसभेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी, ‘हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही तयार केले आहेत’, असं वक्तव्य केलं होतं. जळगावमधील रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन, असंही गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यावरून चित्रा वाघ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊतांची जीभ घसरली होती. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही चु**गिरी बंद करा, असं राऊत म्हणाले होते. हे आक्षेपार्ह वक्तव्य त्यांना चांगलंच भोवल्याचं दिसलं होतं. त्यावरून चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार हरवलंय, शोधून देणाऱ्यास…”

“महाविकास आघाडी करताना काॅंग्रेसला फसवलं जाईल, हे मी स्पष्ट सांगितलं होतं”

“मी हरलो तर राजकारण सोडेन”, नवज्योतसिंह सिद्धूंचं खुलं आव्हान

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर राष्ट्रवादीनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अन् रुपाली ठोंबरे म्हणाल्या ‘…हेच आहेत पवार साहेबांचे संस्कार’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More