बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी हरलो तर राजकारण सोडेन”, नवज्योतसिंह सिद्धूंचं खुलं आव्हान

नवी दिल्ली | पुढील वर्षात 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष तयारीला लागल्याचं दिसतंय. सध्या दिल्लीत सत्तेत असलेला आम आदमी पक्ष (AAP) पंजाबमध्ये आपले पाय पसरण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंजाबच्या राजकारणात लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी अरविंद केजरीवाल यांना थेट आव्हान दिलं आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ‘राजकीय पर्यटक’ म्हणून संबोधलं. त्याचबरोबर राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. याआधी ते खोटी आश्वासने देऊन बाहेर पडले आहेत, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. एका जाहीर सभेला संबोधित करताना सिद्धू यांनी केजरीवाल यांना आव्हान दिलं.

सिद्धू यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर चर्चेला येण्याचं आव्हान केजरीवाल यांना दिलं आहे. पंजाबमध्ये कुठेही या किंवा तुमच्या दिल्लीत बोलवा. तुमच्या घरी बसू. चॅनेल वाल्यांना बोलवा. जर या डिबेटमध्ये हा सिद्धू हारला तर मी राजकारणातून संन्यास घेईल, असंही सिद्धू म्हणाले आहेत.

दरम्यान, केजरीवाल यांनी दिल्लीत आठ लाख नोकऱ्याचे आश्वासन दिले होते, मात्र केवळ 440 नोकऱ्या दिल्या आहेत, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर राष्ट्रवादीनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अन् रुपाली ठोंबरे म्हणाल्या ‘…हेच आहेत पवार साहेबांचे संस्कार’

अजितदादांचा दिलदारपणा! एका मिनिटात केली अमित शहांच्या मुक्कामाची सोय

सोनं-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महाग, वाचा आजचे ताजे दर

भारतीय संघाला मोठा धक्का; विराटनंतर आता आणखी एकाचा राजीनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More