बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर राज्यात Pandemic Act लागू करा”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) निवडणुका घेण्यात याव्यात असे आदेश दिले होते. त्यानंतर ठाकरे सरकारच्या (Thackeray government) अडचणी वाढल्या होत्या. अशातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता ओबीसींच्या जागेवर होणाऱ्या निवडणुका 18 जानेवारीला होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने (Election Commission) केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये यासाठी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे. “आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की, त्यांनी 21 तारखेला पार पडणारी निवडणूक पुढे ढकलावी आणि 21 तारखेची निवडणूक 18 जानेवारीलाच घ्यावी”, असं प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.

राज्य शासनाला देखील माझी विनंती आहे की, त्यांनी तत्काळ ओमिक्राॅन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पॅन्डॅमिक अॅक्ट (Pandemic Act) लागू करावा आणि जोपर्यंत इम्पेरीकल डेटा न्यायालयात सादर करून आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करावी, असंही प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

दरम्यान, एससी, एसटी वगळून राहिलेल्या 53 टक्के जागांवर ओबीसी समाजाला संधी मिळालेली नाही.यामुळे त्यांना ती संधी मिळू शकेल.याबाबतचं पत्र देखील मी निवडणूक आयोगाला देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

भारताचं टेन्शन वाढलं! ओमिक्राॅनचं शतक पुर्ण, केंद्र सरकारने दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

“अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते”, निलेश राणेंच्या दाव्याने खळबळ

झुनझुनवालांना जोर का झटका! ‘या’ शेअर्समुळे फक्त 10 मिनिटात गमावले 318 कोटी

‘भाजप आणि ममता बॅनर्जी मिळून…’; RSS च्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

जय शहांचा ‘तो’ फोटो तुफान व्हायरल; दिग्गजांनी केली सडकून टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More