बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भाजप आणि ममता बॅनर्जी मिळून…’; RSS च्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. काँग्रेसला डावलून देशात तिसरी आघाडी उघडण्याचा प्रयत्न करताना ममता बॅनर्जी करत आहेत. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची देखील भेट घेतली होती. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघशी (RSS) संबंधित बंगाली मासिकात दावाने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.

RSSच्या बंगाली मासिकात प्रकाशित झालेल्या एका लेखात दावा करण्यात आला आहे की, भाजप आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोघांचेही काँग्रेस-मुक्त भारतचे स्वप्न आहे. या वक्तव्यामुळे आता दिल्लीत एकच खळबळ उडाल्याचं कळतंय. मात्र, भाजपने या लेखावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

RSSच्या या लेखात करण्यात आलेलं वक्तव्य निराधार असल्याचं भाजपने म्हटलं आहे. पक्षाची अधिकृत या भूमिकेपेक्षा वेगळी असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. तर तृणमूल काँग्रेसनेही भगवा छावणीशी तडजोड केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

दरम्यान, काँग्रेसने मात्र भाजप आणि ममतांचं गुपित उघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या लेखामध्ये ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीविषयी देखील वक्तव्य करण्यात आलं आहे. त्यामुळे आता दिल्लीतील घडामोडींना देखील वेग आल्याचं दिसतंय.

थोडक्यात बातम्या-

जय शहांचा ‘तो’ फोटो तुफान व्हायरल; दिग्गजांनी केली सडकून टीका

नाथाभाऊंनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम; तब्बल 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“कदाचित मी पहिलाच मंत्री असेल ज्याने…”, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा

“हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य या शब्दांचा अर्थ भाजपला कळत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More