मुंबई | आयपीएलचा 37 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायन्ट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये खेळला गेला. नाणेफेक जिंकून मुंबईनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी लखनऊच्या स्फोटक फलंदाजीवर काही प्रमाणात अंकूश लावल्याचं दिसलं.
लखनऊचा फलंदाज कृणाल पांड्याची विकेट घेतल्यानंतर पोलार्डनं खास सेलिब्रेशन केलं आहे. हाताची घडी बांधत पोलार्डनं पाहण्यासारखं सेलिब्रेशन केलं. मनिष पांडेचा विकेट घेतल्यावर पोलार्डनं आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. हा सामना पाहण्यासाठी मुंबईचे संघमालक अंबानी कुटुंब आलं होतं.
मुंबईनं गोलंदाजांची धार कायम ठेवत आक्रमक फलंदाजी असलेल्या लखनऊला कमी धावांवर रोखण्यात यश मिळवलं. लखनऊकडून कर्णधार केएल राहुलनं या हंगामातील दुसरं शतक झळकावलं. राहुलनं नाबाद 103 धावा केल्या. पण सर्वात जास्त चर्चा तर पोलार्डच्या सेलिब्रेशनची झाली.
दरम्यान, पोलार्डच्या सेलिब्रेशननं सामन्यात एकदम रंगत आणली. सामन्याचं चित्र बदलणण्यात पोलार्डचा हातखंडा बसलेला असल्यानं सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या व्हायरलं होत आहे.
पाहा व्हिडीओ –
Krunal Pandya Wicket https://t.co/jbfpdSMDz3
— MohiCric (@MohitKu38157375) April 24, 2022
थोडक्यात बातम्या –
“लतादीदी मला नेहमी म्हणायच्या माणूस आपल्या वयानं नाही तर…”, नरेंद्र मोदी भावूक
“माझ्यासाठी तुम्ही जे काही केलं…”, सचिनला लेकाकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; पाहा व्हिडीओ
भाजप नेत्यांकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी तर फडणवीसांनी केलं शरद पवारांचं कौतूक, म्हणाले…
“…नाहीतर उद्या कुणीही सुरक्षित राहणार नाही”
“कोण हा फडतूस रवी राणा?, प्रश्न जर सुटणार असतील तर नरेंद्र मोदींच्या…”
Comments are closed.