बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाच जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं! ‘या’ तारखेला होणार मतदान

मुंबई | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणूक स्थगित करण्यात आली होती. 7 जुलै 2021 रोजी होत असलेले मतदान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान स्थगित केलं होतं. मात्र,  आता स्थगित करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयुक्तांनी जाहीर केला आहे.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता या निवडणुकांसाठी मतदान येत्या 5 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व ठिकाणी मतमोजणी ही 6 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं राज्य निवडणुक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी सांगितलं आहे.

पालघर जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2021 या दरम्यान नामनिर्देशनपत्रे उमेदवारांना दाखल करता येतील. त्याचबरोबर 21 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छननी होईल. पालघरसह सर्व ठिकाणी 21 सप्टेंबर 2021 रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच 27 सप्टेंबर रोजी नामनिर्देशपत्रे मागे घेता येतील, असं निवडणुक आयोगाने सांगितलं आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गुणांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये यंदा कोणता पक्ष आघाडी घेणार, ते आता पाहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

सुशांतसिंग राजपूत पुन्हा चर्चेत! ट्विटर अचानक ट्रेंड होतंय ‘CBI CONFIRMS SSR MURDER’

पैसे परत न दिल्यानं भरमंडईत महिलेची छेडछाड; महिलेनं दिला आत्मदहनाचा इशारा

‘काॅंग्रेसनेच दहशतवादाला जन्माला घातलं’; योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर जहरी टीका

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More