काय सांगता?, ‘या’ अभिनेत्रीमुळे कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाली, नवी माहिती आली समोर

pooja bedi

Pooja Bedi | भारतात कंडोमचा वापर आणि त्याबद्दलच्या मानसिकतेत मोठा बदल घडवणाऱ्या काही निवडक घटनांमध्ये अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi) हिच्या एका धाडसी निर्णयाचा मोठा वाटा आहे. आज ज्या सहजपणे टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावर कंडोमच्या जाहिराती दाखवल्या जातात, त्यामागे एका जाहिरातीने मोठा सामाजिक बदल घडवला. 

नीरोधपासून कामसूत्रपर्यंत-

1990 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात कंडोमसाठी ‘निरोध’ हा सरकारी ब्रँडच प्रचलित होता. मात्र, समाज अजूनही कंडोमबद्दल मोकळेपणाने बोलण्यास तयार नव्हता. प्रसिद्ध जाहिराततज्ज्ञ अलीक पदमसी (Alyque Padamsee) यांच्या नेतृत्वाखाली ‘कामसूत्र’ ब्रँडने कंडोमची संकल्पना बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केवळ गर्भनिरोधक साधन म्हणून नव्हे, तर लैंगिक आनंदाच्या दृष्टिकोनातून कंडोम सादर करण्याचा विचार केला आणि त्यानुसार एक धाडसी जाहिरात तयार करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by POOJA BEDI (@poojabediofficial)

कंडोम जाहिरातीत काम करणारी पहिली अभिनेत्री

या नव्या जाहिरातीसाठी बॉलिवूडमधील कोणतीही अभिनेत्री तयार नव्हती. मात्र, पूजा बेदीने (Pooja Bedi) हा प्रस्ताव स्वीकारला आणि ‘कामसूत्र’ कंडोमची जाहिरात केली. या जाहिरातीत तिच्यासोबत मॉडेल मार्क रॉबिनसन (Marc Robinson) झळकला होता.

ही जाहिरात प्रचंड वादग्रस्त ठरली. दूरदर्शनने ती त्वरित बॅन केली, तर अनेक खासगी वाहिन्यांनीही ती दाखवण्यास नकार दिला. तरीही, या जाहिरातीने देशभरात मोठी चर्चा निर्माण केली आणि कंडोमबाबतच्या मानसिकतेत बदल घडवला.

जाहिरातीनंतर कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ-

पूजा बेदीने (Pooja Bedi) सांगितले होते की, “कामसूत्र कंडोम केवळ गर्भनिरोधक साधन नव्हे, तर महिलांच्या आनंदाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.” तिच्या या जाहिरातीमुळे देशभरात कंडोम विक्रीत झपाट्याने वाढ झाली. लोकांनी उघडपणे मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन कंडोम विकत घेण्यास सुरुवात केली.

आज जरी कंडोमच्या जाहिरातींवर पूर्वीसारखी बंधने नसली, तरी ९० च्या दशकात पूजा बेदीच्या एका जाहिरातीमुळे समाजाच्या मानसिकतेत मोठा बदल घडला, हे नक्की!

News Title : Pooja Bedi’s Kamasutra Ad That Changed India’s Condom Perception

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .