यवतमाळ | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवनवीन गोष्टींचा उलगडा होत आहे. अरूण राठोडला झालेल्या अटकेनंतर याप्रकरणाला अजून वेगळं वळण प्राप्त झालं आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव या प्रकरणात पुढे आलं आहे.
6 फेब्रुवारीला पहाटे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची घटना घडली. गर्भपात झालेली ती पूजा कोण? असा प्रश्न उपस्थित झाला असताना रूग्णालय प्रशासन यावर बोलण्यास तयार नाही. रूग्णालयात दाखल झालेल्या त्या तरूणीने आपला पत्ताही खोटा दिला होता.
नाव बदलून पूजाचा गर्भपात यवतमाळच्या महाविद्यालयात झाला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व प्रकरणात गर्भपात केलेल्या युनिट 2 च्या डॉक्टरांचे नाव पूढे आल्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना गर्भपात करण्यात आलेल्या तरूणीचं नाव पूजा चव्हाण नसून पूजा अरूण राठो़ड असं सांगितलं आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्त्रीरोग विभागाचे प्रमूख डॉक्टर 6 दिवसांपासून रजेवर आहेत. मंगळवारी ते कामावर परतले पण, रूग्णालयात कूठेही दिसून आले नाही. या सर्व प्रकरणावर अधिकृतपणे बाेलण्यास कोणीही तयार नसल्याचं पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना दिलासा
होम क्वारंटाइन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई
“काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला”
हे आघाडीचं सरकार, काँग्रेसचं सरकार आल्यावर वीजेचं बिल माफ करणार- नाना पटोले
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण!