Top News महाराष्ट्र मुंबई

‘दरवाजा तोड, मोबाईल ताब्यात घे’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल

Photo Courtesy- Facebook/ Pooja chavan

मुंबई | पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील कथित मंत्री आणि अरूण नामक व्यक्तिच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये कथित मंत्री आणि अरूण यांचं पूजाच्या आत्महत्येआधीचंही संभाषण आहे. याबाबत टीव्ही 9 मराठीने वृत्त दिलं आहे.

कथित मंत्री आणि संबंधित व्यक्तिमधील 12 ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. यामधील पूजाच्या मृत्यूनंतर कथित मंत्री अरूणला तिचा मोबाईल त्यांना ताब्यात घ्यायला सांगतात. दरवाजा तोड आणि आत जा, विलाससोबत जा आणि मोबाईल ताब्यात घे, असं ते सांगतात.  त्यानंतर तो मुलगा मंत्र्यांना पूजाचा मृत्यु डोक्यावर पडून झाल्याचं सांगतो, त्यानंतर तुम्ही येणार आहात की नाही, असं तो कथित मंत्र्यांना विचारतो आणि तुमचा फोन चालू राहू द्या, असंही तो ऑडिओमध्ये बोलत असल्याचं ऐकू येत आहे.

ऑडिओमध्ये ज्यावेळी मुलीचा मृत्यु झाला त्यानंतर पोलीस संबंधितांना विचारतात तेव्हा त्यामध्ये एक मुलीचा सख्खा चुलतभाऊ आणि तिचा मित्र एकत्र राहत असल्याचं सांगतात. मुलीबाबत पोलीस आणखी माहिती विचारतात त्यामध्ये ते पूजा चव्हाण, वय 22 आणि मुळ पत्ता परळी वैजनाथ असं सांगतात.

दरम्यान, 8 फेब्रुवारीला पुण्यातील महंमदवाडीत पूजा चव्हाणने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. रविवारी रात्री ही घटना घडली होती. पूजाने केलेली आत्महत्या मानसिक तणावातून केल्याचं सांगितलं आहे. मात्र यामध्ये विदर्भातील एका मंत्र्याचं नाव घेतलं जात असताना आता ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळातील अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहीजे, एका हाताने टाळी वाजत नाही”

देवेंद्र फडणवीसांच्या ‘निवडून येणार’ला अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मोदीजी, पृथ्वीराज चौहान यांनी केेलेली ‘ती’ चूक तुम्ही करू नका- कंगणा राणावत

‘माझी पक्षात घुसमट होतीये’; ‘या’ खासदाराची राज्यसभेत राजीनाम्याची घोषणा

“पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारीपासून याचचं हं, पण खबरदार जर…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या