बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांना हवं ते मिळालं, आता कारवाई होणार?

पुणे | पूजा चव्हाण प्रकरणात कुणीही तक्रार दाखल करण्यास पुढं येत नसल्यामुळे या प्रकरणी कारवाई केली जात नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं होतं. पुणे पोलिसांच्या या भूमिकेवर भाजपसह राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. अखेर आता या प्रकरणात पोलिसांनी हवी होती ती गोष्ट घडली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पहिली तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांनी ही तक्रार दिली आहे.

वानवडीमधील एका सोसायटीत पूजा चव्हाण या तरुणीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप भाजपनं केला होता. याप्रकरणी काही ऑडिओ क्लिप्स तसेच फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल झाले होते. मात्र या प्रकरणात ना कुणाविरोधात कारवाई झाली ना पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. त्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती.

भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आजच ज्या वानवडी परिसरात ही घटना घडली तिथं भेट देऊन नंतर पोलीस ठाण्याला भेट दिली होती, मात्र याठिकाणी गुन्हा दाखल करुन घेण्याच्या मुद्द्यावरुन त्यांची अन् येथील पीआय लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. पोलिसांनी सुमोटो वापरुन स्वतः गुन्हा दाखल करावा अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र मुलीचे आई-वडील किंवा इतर कुणीही तक्रार केली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं.

दरम्यान, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा यांनी अखेर या प्रकरणात पुढाकार घेतला आहे. त्यांनी याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रार अर्जात थेट वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलिसांचं जी तक्रार हवी होती ती मिळाली असून पोलीस काय कारवाई करतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राठोड यांना मोठा धक्का; खासदार गिरीश बापट यांच्या सूनेकडून पोलिसात तक्रार दाखल

मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोना, कोरोना- देवेंद्र फडणवीस

“आम्ही वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्राताईंसारखी “वाघा”ला साजेशी भूमिका घ्या!”

“दोन मिनिटाच्या भेटीत बहुदा कानात सांगितलं असावं, मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही”

‘पबजी लव्ह स्टोरी’; पबजी खेळत असताना जडलं प्रेम, विवाहित महिला झाली बेपत्ता त्यानंतर….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More