बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राठोडांनी पाच कोटी दिल्याचा आरोप केल्यावर लहू चव्हाणांनी शांता राठोडांविरोधात उचललं मोठं पाऊल

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी आपला राजीनामा दिला आहे. संजय राठोडांनी राजीनामा दिल्यावर हे प्रकरण शांत होईल असं वाटत होतं मात्र या प्रकरणामध्ये अनेक ट्विस्ट येऊ लागले आहेत. अशातच शांता राठोड या महिलेने आपण पुजाची आजी असल्याचं म्हणत पूजाच्या आई-वडिलांनी पाच कोटी घेतल्याचा आरोप केला होता. यामुळे सर्वांना धक्का बसला होता मात्र यावर लहू चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया देत आरोप फेटाळले आहेत तर आता त्यांनीही शांता राठोड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

लहू चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्याविरोधात परळी शहर पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. शांताबाई यांनी लहू चव्हाण यांच्यावर पाच कोटी रुपये घेऊन तोंड बंद केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरुन संतापलेल्या लहू चव्हाण यांनी बदनामीची तक्रार पोलिसात केल्याचं समजत आहे. हे प्रकरण कुठे जाऊन थांबणार हे सांगता येत नाही.

शांताबाई या पूजाची आजी नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमच्या भावकीत कदाचित त्या असतील पण गेल्या 25 वर्षांपासुुन आमची आणि शांताबाईंची भेट नाही त्यामुळे असं कोणीही येऊन फिर्याद दाखल करेल, पोलिसांनी त्याची चौकशी करून मग पुढील कारवाई करायला पाहीजे, असं लहू चव्हाण यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, पूजा चव्हाणच्या आई-वडिलांवर खूप दबाव आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रूपये दिल्याचा गंभीर आरोप शांता राठोड यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला होता.

थोडक्यात बातम्या-

‘शिवसेना नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका’, कंगणानं उचललं हे मोठं पाऊल

‘कोहली’ने केला होता तब्बल 2 लाखांचा दारूसाठा, पोलिसांनी धाड टाकल्यावर पितळ पडलं उघडं!

फुलराणीच्या भूमिकेत दिसणार बॉलिवुडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या!

“अर्थसंकल्पात 35 हजार कोटींची तरतूद असताना कोरोनाच्या लसीसाठी 250 रुपये का?”

धोनीच्या चेन्नईला मोठा झटका, हा निर्णय बसणार चेेन्नईच्या जिव्हारी?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More