Top News महाराष्ट्र मुंबई

‘…तर मीच आत्महत्या करेन’; पूजा चव्हाणचे वडील आक्रमक

Photo Credit- Pooja chava facebook account

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. पूजाच्या आत्महत्येशी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील शिवसेना नेते संजय राठोड यांचं नाव जोडलं गेलं आहे. राज्यभर पूजाविषयी चर्चा आहे यावरून विरोधी पक्षानेही सरकारला निशाण्यावर धरलं आहे. अशातच पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पूजाच्या मित्राचा रात्री दोन वाजता फोन आला की पूजा बाल्कनीतून पडली आहे. तुम्ही लवकरात लवकर निघुन या. आम्ही पुण्याला गेलो तर मयत झालेली होती. तुम्ही आमची बदनामी थांबवा नाहीतर मीच आत्महत्या करेल, असं पूजाचे वडील म्हणाले.

आमची मुलगी अशा प्रकारचं कृत्य करणार नाही तिच्यावर पुर्ण विश्वास होता असं म्हणत लहू चव्हाण यांनी पूजाच्या आत्महत्येचं राजकारण थांबवा, असं आवाहनही केलं आहे. आमची मुलगी चांगली होती उगाच तिला बदनाम करत असल्याचंही लहू चव्हाण यांनी म्हटलं आहे.

ज्यावेळी मी पुण्याला गेलो होतो त्यावेळी आम्ही चौकशी केली. तिच्यासोबत राहणारा मुलगा आम्ही विचारलं तर तो म्हटला की तिला चक्कर आली आणि ती खाली पडली आणि त्यावेळी मी खाली होतो. त्यामुळे मी कोणावर आरोप करू, असंही लहू चव्हाण म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ढोंगीजीवी- नाना पटोले

जेनेलिया देशमुखने शेअर केला बेडवर डान्स करतानाचा व्हीडिओ, पाहा व्हीडिओ

“ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या”

‘तिच्या वेदना पाहून मी…’; नवऱ्याने ‘व्हॅलेंटाईन डे’ला पत्नीला गिफ्ट केली किडणी

‘…तिथे तिथे मी नडणार आणि भिडणारच’; चित्रा वाघ आक्रमक

“फुकटचं दिलं तर लोकांना वाटतं गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या