बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात पूजाच्या आईचा अरूण राठोडबाबत धक्कादायक खुलासा; म्हणाल्या…

मुंंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत सध्या अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहे. या प्रकरणाशी संंबंधित 12 ऑडिओ क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या त्यामध्ये अरूण राठोड नावाचा तरूण आणि कथित मंत्र्यासोबतचं संभाषण आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेलं. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील तरूण अरूण राठोड पूजासोबत एका रूममध्ये राहत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये अरूण राठोड हा महत्वाचा दुवा असल्याचं बोललं जात आहे. मात्र अशातच पूजा चव्हाणची आई मंडूबाई चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया टीव्ही9ला दिली आहे.

अरूण राठोड आमच्या घरी कधी आला नाही. आम्ही त्याला ओळखत नाही. त्याचं फक्त आम्ही नाव ऐकलं असल्याचं पूजाच्या आईने सांगितलं आहे. तर विलास चव्हाण पूजाचा मावसभाऊ होता का यावर, विलास चव्हाणला पूजा फक्त राखी बांधत होती. पूजा ही आमच्यासाठी मुलासारखीच होती त्यामुळे सर्व तिला राखी बांधत होते तर सर्वांची काळजी घ्या असं पूजा नेहमी सांगायची, असं मंडूबाई चव्हाण म्हणाल्या.

पूजाने आम्हाला काहीच सांगितलं नाही. दोन ते चार दिवसांत येते आणि भेटून जाते, असं तिने सांगितलं. बाकी काहीच बोलली नाही. उगाच काही तरी बदनामी करायची, त्यांना काही मुलीबाळी नाहीत काय आमची बदनामी थांबवा मला आणखी पाच मुली असून आम्ही सगळेच आत्महत्या करणार आहोत, असा इशाराही पूजाच्या आईने दिला आहे.  त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरूण राठोड हा संजय राठोड यांचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. तर यवतमाळमध्ये गर्भपातावेळी पूजा अरूण राठोड, पत्ता शिवाजी नगर नांदेड अशी दोन नाव तपासात पुढे आली आहेत. त्यामुळे दोन्ही राठोड वेगळे आहेत की एकच हा सवाल उपस्थित होत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘थंडीने गॅसचा दर वाढले’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब दावा

बसा बोंबलत! ‘कंडोम’च्या नादात घालवले तीन लाख रुपये

“संजय राठोडांवर कारवाई करण्याची धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो”

लाॅकडाऊनबाबत विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मनमोहन सिंग नेहमी संकटांचा सामना करायचे, तुम्ही पळ काढत आहात- संजय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More