मुंबई | पूजा चव्हाण प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. आपला या प्रकरणात काहीही संबंध नसल्याचा दावा संजय राठोड यांनी केला असला तरी त्यांचा पाय खोलात नेणारे पुरावे दिवसेंदिवस समोर येत आहेत. आताही असाच एक गिफ्टबॉक्स समोर आला आहे, ज्यामुळे संजय राठोड यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
संजय राठोड यांनी पूजा चव्हाणला पाठवलेल्या गिफ्टबॉक्सचे फोटो माध्यमांच्या हाती लागले आहेत. या गिफ्टबॉक्समध्ये पाठवण्यात आलेल्या वस्तू पाहून अनेकांना धक्का बसू शकतो. कारण यामध्ये सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, इम्पोर्टेट गॉगल यासारख्या अनेक वस्तुंचा समावेश असल्याचं दिसत आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात तिच्यासोबतचे संजय राठोड यांचे फोटो याआधीच समोर आले होते. यामध्ये संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त पूजाने वनमंत्री नाव लिहिलेला केक असो किंवा त्यांचा फोटो असलेला केक खातानाचा फोटो असो, यांचा समावेश होता. या गबरु नाव लिहिलेला केकही यामध्ये होता. शिवबंधन बांधलेला एक हात पूजाला केक भरवताना फोटो देखील यामध्ये होता.
त्यानंतर आता नवीन फोटो समोर आल्यानं या प्रकरणात संजय राठोड यांच्याभोवतीचं गूढ आणखी वाढलं आहे. या फोटोंमध्ये पूजा चव्हाण एक गिफ्टबॉक्स दाखवत असल्याचं दिसत आहे. या गिफ्टबॉक्समध्ये अत्यंत महागड्या वस्तू आहेत, याशिवाय वनमंत्री संजय राठोड यांचं व्हिजिटिंग कार्ड देखील यामध्ये दिसत आहे.
फोटोत पूजा ज्या हॉटेलमध्ये दिसते, त्याच हॉटेलमधील तिचे काही साडी घातलेले फोटोही आहेत. एका फोटोत त्याच हॉटेलमधील बेडवर पैसे मोजत बसलेली पूजा देखील पहायला मिळत आहे.
माझ्यावर समाजाचं प्रेम आहे, त्यामुळे माझ्यासोबत कोणीही फोटो काढतो, असा दावा संजय राठोड यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र आता रोजच पूजा आणि संजय राठोड यांचे नवनवे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे नेमकं खरं काय समजायचं असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
खालील फोटोत पूजा सोन्याची चैन घातलेली दिसून येत आहे-
थोडक्यात बातम्या-
त्यांनी गर्दी जमवली नाही, शिवसेनेच्या मंत्र्याला शिवसेनेच्याच मंत्र्याकडून क्लीनचिट!
आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची मागणी!
महाविकास आघाडीला मोठा धक्का, ‘या’ पक्षाची स्वबळावर लढण्याची तयारी?
नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पहिल्याच दिवशी मोठा वाद, ‘या’ कारणामुळे भडकले इंग्रज!
“सत्तेत आल्यानंतर हिटलरने देखील मोठं स्टेडियम बांधून स्वतःचं नाव दिलं होतं”
Comments are closed.