पुणे महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; ही धक्कादायक माहिती आली समोर

पुणे | बी़ड जिल्ह्यातील परळी वैज्यनाथ येथील रहिवाशी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ‘रोज डे’ला पुण्यातील महंमदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या तरुणीच्या आत्महत्येशी ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचं नाव जोडलं जात आहे. अशातच या प्रकरणी तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती हाती लागली आहे.

पूजा चव्हाणने आत्महत्या करण्याच्या आधी दारु प्यायली होती, असा जबाब पूजा सोबत राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या मित्राने पोलिसांना दिला आहे. यावरुन पूजा दारु पिली होती की कोणी जबरदस्ती करुन तिला पाजली होती?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्स पोलिसांना मिळाल्या आहेत. त्या क्लिप्स बंजारा भाषेत असल्यामुळं त्याच्या भाषांतराचं काम सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच पूजा चव्हाणच्या प्रकरणाचा तपास सुरु असून, तिचा मृत्यू आत्महत्येनेच झाला आहे, असं रिपोर्टमध्ये नोंदवलं नसल्याची माहिती वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड यांनी दिली आहे.

दरम्यान, पूजा चव्हाणच्या प्रकरणात राज्यातील अनेक राजकिय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर विरोधी पक्ष भाजपने या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

जगातील सर्वात जबरदस्त इलेक्ट्रीक कार लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत

नगरसेवकाच्या हत्येचं धक्कादायक CCTV फुटेज; हलक्या काळजाच्या लोकांनी पाहू नये!

“राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत”

आता येतेय सर्वात स्वस्त स्कॉर्पिओ; किंमत असणार फक्त….

‘या’ कारणामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अद्याप कारवाई नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या