बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर; पुणे पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय

पुणे | टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरूण राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. आता याप्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पुणे पोलिसांनी पूजा आत्महत्या आकस्मिक घडलेली असल्याचं सांगितलं आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सर्व बाजूने तपास करण्यात आला आहे. त्यामध्ये कुठेही तिचा खून करण्यात आल्याचं निष्पन्न झालेलं नाही. त्यामुळे यासंदर्भात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती 21 एप्रिल 2022 रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली, असं पोलिस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्यात.

पंधरा दिवसांच्या मुदतीत त्यावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे यासंदर्भात समरी अहवाल वानवडी सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी दाखल केला आहे. 21 एप्रिल 2022 रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. पंधरा दिवसांच्या मुदतीत त्यावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे यासंदर्भात समरी अहवाल वानवडी सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी दाखल केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुणे महानगरपालिका निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा, म्हणाले…

राज्यात पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

“उद्धव ठाकरे यांनी स्वत: पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाही”

‘अब देवेंद्र अकेले ही नहीं, सारी कायनात उनके साथ है’- अमृता फडणवीस

“आमचे 106 त्यांच्या 170 वर भारी; तुमची झोप उडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More