Top News पुणे महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ऑडिओ क्लिप्स व्हायरल

पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. तिच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्तींच्या संभाषणात ‘ती आत्महत्या करणार आहे’ असा उल्लेख ऐकायला मिळत आहे, तर दुसरी क्लिप आत्महत्या केल्यानंतरची असल्याचा दावा केला जात आहे, त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

मूळची परळी येथील २२ वर्षीय पूजा चव्हाण शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला आली होती. ती आपला चुलत भाऊ आणि त्याच्या एका मित्रासोबत महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीमध्ये राहात होती. याच सोसायटीत तीने  आत्महत्येचं पाऊल उचललं.

पूजाच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. महाविकास आघाडी सरकारधील एका बड्या मंत्र्यासोबत तीचे प्रेमसंबंध होते आणि याच संबंधातून तीने आत्महत्या केल्याची चर्चा होती. भाजपने देखील हा मुद्दा उचलून धरला असून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.  मात्र या प्रकरणात मुलीच्या घरच्यांनी कुठलीही तक्रार दाखल न केल्यानं पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

दरम्यान, व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.  व्हायरल क्लिपमध्ये अरुण नावाच्या कार्यकर्त्याचे आणि संबधित मंत्र्याचे संभाषण आहे. सदर कार्यकर्ता मृत तरूणीच्या जवळ उभा होता तेव्हा संबधित मंत्र्याने तिचा मोबाईल ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे. मात्र या व्हायरल क्लिपमुळे आतातरी पोलीस या प्रकरणाचा तपास करणार का? हा प्रश्नच आहे.

थोडक्यात बातम्या

एक नवरा, एक प्रियकर… आणखीही अनेकांसोबत संबंध, शेवट काळजाचा थरकाप उडवणारा

ती पुन्हा येतेय… जावा पुन्हा लॉन्च करतेय आपली खतरनाक बाईक!

‘हा’ आईपीओ मंगळवारी बाजारात धडकणार; गुंतवणुकदांरांसाठी मोठी संधी

अक्षय कुमारचं टेन्शन वाढलं, ‘अशा’प्रकारे बसू शकतो मोठा फटका

राज्य सरकारचा फ्लिपकार्टसोबत करार, तुम्हालाही होऊ शकतो फायदा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या