मुंबई | पुण्यातील महंमदवाडी येथे पूजा चव्हाण या तरूणीने आत्महत्या केली आहे. या तरूणीच्या आत्महत्येची संशयाची सुई महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याभोवती फिरत आहे. विरोधकांनीही हे प्रकरण लावून धरलं आहे. अशातच पूजा चव्हाणच्या बहिणीने एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने माझी बहीण वाघीण असल्याचं म्हटलं आहे.
दोन दिवसांपासून पाहत आहे की तुम्ही काहीही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता, ती फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती माझी बहीण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की कसं काही करेल आणि हे तुम्हालापण चांगलंपणे माहिती आहे, असं पूजा चव्हाणची बहीण दिया चव्हाणने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मला आजसुद्धा विश्वास होत नाही तिने सुसाईड केलं आहे आणि जरी केलं असेल तर मोठीच कोणती तरी गोष्ट असेल. दीदीने नेहमी सर्वांना मदत केली आहे. काही विचार न करता तिने फक्त बंजारा समाज नाहीतर सर्वांना पाठिंबा दिला आहे. जेवढं होईल तेवढं तिने मदत केली आहे. मी तिची लहान बहीण आहे हे माझं नशीब असल्याचं दिया म्हणाली.
दरम्यान, ती आज आपल्या सोबत नाही याचं जर तुम्हाला एवढं दु:ख होत असेल तर विचार करा. आम्ही कसा स्वत:ला सांभाळत आहोत. मला आधीच याचा त्रास सहन होत नाही. मम्मी पप्पाला सांभाळायचं आहे आणि तुम्ही अशा पोस्ट टाकत आहात. निदान तिला जस्टिस मिळू शकत नाही तर अशा पोस्ट करुन आम्हाला त्रास तर देऊ नका. तिला स्वर्गामध्ये शांतीने राहू द्या, ती जर हे सर्व पाहत असेल तर तिला किती त्रास होत असेल, अशी भावनिक पोस्ट दिया चव्हाणने केली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘दरवाजा तोड, मोबाईल ताब्यात घे’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल
मुख्यमंत्री महोदय, सर्व पुरावे असतांना वाट कसली पाहताय- चित्रा वाघ
“राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहीजे, एका हाताने टाळी वाजत नाही”
देवेंद्र फडणवीसांच्या ‘निवडून येणार’ला अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
मोदीजी, पृथ्वीराज चौहान यांनी केेलेली ‘ती’ चूक तुम्ही करू नका- कंगणा राणावत