“माझी बहिण प्रीतम, पंकजा मुंडे यांच्यासोबतही फिरली ते फोटो का व्हायरल करत नाही”
बीड | सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत असून यामध्ये अनेक गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांंचं नाव समोर येत आहे. संजय राठोड यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पूजा चव्हाणच्या प्रकरणात सध्या सोशल माध्यमांवर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणात समोर येत असलेल्या नवनवीन गोष्टींवरून अनक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र अशातच यावर पूजा चव्हाणची बहिण दिया चव्हाणने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माझी बहिण वाघीण होती. ती आत्महत्या करुच शकत नाही, या पोस्टवर मी आताही ठाम आहे. पण हा प्रकरणी कोणासोबत नाव जोडणेही योग्य नाही. माझी बहिण प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासोबतही फिरली होती. ते फोटो तुम्ही का व्हायरल करत नाही. कारण ते पुरुष नाही यासाठी?, असा सवाल दियाने सर्वांना केला आहे.
मी सध्या दहावीला आहे. नेहमी माझ्या बहिणीबद्दल बदनाम केलं जात आहे. जर पुढे त्रास वाढला तर मी आत्महत्या करेन. याची चौकशी झाली पाहिजे पण बदनामीसोबत चौकशी नाही झाली पाहिजे, असं म्हणत दियाने इशारा दिला आहे. त्याआधी पूजा चव्हाणची आई मंडूबाई चव्हाण यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, पूजाने आम्हाला काहीच सांगितलं नाही. दोन ते चार दिवसांत येते आणि भेटून जाते, असं तिने सांगितलं. बाकी काहीच बोलली नाही. उगाच काही तरी बदनामी करायची, त्यांना काही मुलीबाळी नाहीत काय आमची बदनामी थांबवा मला आणखी पाच मुली असून आम्ही सगळेच आत्महत्या करणार आहोत, असा इशाराही पूजाच्या आईने दिला आहे. त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून घेतली निवृत्ती
‘या’ पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; ‘या’ तारखेला होणार मतदान
संजय राठोड समर्थकांकडून गलिच्छ प्रकार सुरु, चित्रा वाघ यांना केलं जातंय टार्गेट!
सॅमसंगचा नवा स्मार्टफोन; कॅमेराच्या ‘या’ नव्या फिचर्स सोबत बरंच काही….
पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
Comments are closed.