महाराष्ट्र मुंबई

पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेना आक्रमक; संजय राठोडांना दिले ‘हे’ सक्त आदेश

मुंबई | परळीची असलेल्या पूजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली. हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचा हात असल्याची चर्चा होती.

या प्रकरणी कोणीही थेट कोणत्या नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. आता मात्र विरोधी पक्ष भाजपने शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव घेत याप्रकरणावरून त्यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.

भाजपकडून हे प्रकरण सातत्याने लावून धरण्यात येत असल्याने ठाकरे सरकारसमोरील अडचण वाढत आहे. यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेने संजय राठोड यांना सक्त आदेश दिल्याचं कळतंय.

प्रसारमाध्यमांशी बोलू नको, असे आदेश शिवसेनेने संजय राठोड यांनी दिल्याची माहिती आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर संजय राठोड यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

थोडक्यात बातम्या-

आता ट्रॅक्टरही सीएनजीवर, वर्षाला एक लाख रूपये वाचणार!

कोण होती पूजा चव्हाण? का होतेय तिच्या आत्महत्येची एवढी चर्चा???

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; ही धक्कादायक माहिती आली समोर

कशी नशिबानं थट्टा आज मांडली!; ‘शून्य…’ विराट कोहलीचा विश्वासच बसला नाही!

जगातील सर्वात जबरदस्त इलेक्ट्रीक कार लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या