पुणे महाराष्ट्र

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, ‘त्या’ मंत्र्याचे फोटो व्हायरल!

पुणे | पुण्यातील पुजा चव्हाण नावाच्या 22 वर्षीय युवतीने रविवारी आत्महत्या केली होती. या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

पुजा चव्हाण आत्महत्येशी विदर्भातील शिवसेनेच्या एका मंत्र्याचं आडवळणाने नाव घेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारवर निशाणा साधला आहे.

तरुणीच्या पालकांनी मात्र कोणाविरुद्धही तक्रार दिलेली नाही. मात्र या तरुणीचं फेसबुक प्रोफाईल पाहिल्यानंतर संबंधित मंत्री आणि ती तरुणी हे एकमेकांना चांगले ओळखत असावेत, असं दिसून येतं आहे. 2018 च्या सुरूवातीला हा मंत्री आणि संबंधित तरुणीचा परिचय झाल्याचं दिसून येत आहे.

पुजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. चार दिवसांनंतर देखील या आत्महत्येचं गूढ कायम आहे.

थोडक्यात बातम्या-

“भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल, त्यांनी अधुनमधून गोवा सरकारचंही विमान वापरावं”

शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावं अन्यथा…- उदयनराजे भोसले

“पुजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे”

प्रेमाच्या आठवड्यात त्यानं मृत्यूला कवटाळलं, प्रेयसीबद्दल लिहिल्या धक्कादायक गोष्टी

“…म्हणून राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या