पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चर्चेत आहे. या प्रकरणातील काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये कथित मंत्री आणि अरुण राठोड यांच्यातील संवाद आहे. तो कथित मंत्री संजय राठोडच आहेत असा थेट आरोप भाजप नेत्या व महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सर्वप्रथम केला होता. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात पुजाचा चुलत भाऊ विलास चव्हाण याचे नाव समोर येत आहे. विलास पुण्यातील सामाजिक वनीकरण विभागात कामाला असल्याचं समजत आहे. तिथे तो शिपाई पदावर कार्यरत असून ८ फेब्रुवारीपासून कामावर गैरहजर असल्याची माहिती मिळत आहे.
जानेवारीपासून विलास तिथं नोकरीला आहे. त्याची थेट भरती करण्यात आलेली नाही. तो एका बाहेरील मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून तिथं नोकरीला लागला आहे. मात्र, या कॅबिनेट खात्याचे मंत्री संजय राठोड आहेत त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. पुजानेच तिचा भाऊ विलास याला संजय राठोड यांच्या ओळखीचा फायदा करून वनखात्यात नोकरीला लावले का? असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणात ज्या व्यक्तींचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यामध्ये विलासचाही समावेश आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टीकरण दिलेलं नसल्यानं या प्रकरणातील रहस्य दिवसेंदिवस वाढतच आहे.
थोडक्यात बातम्या-
‘या’ भाजप नेत्याची एसआयटी चौकशी करा; सुप्रिया सुळे यांची मागणी
कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात नवी नियमावली लागू, जाणून घ्या नेमकी काय आहे
धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नवं फोटोशूट; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस
राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, खरं तर ही आमची मोठी चूक- विश्वजीत कदम
जिल्हाधिकारी असावा तर असा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय!