Top News बीड महाराष्ट्र

‘…तर आज पूजा जिवंत असती’; पूजाच्या आजोबांची भावूक प्रतिक्रिया

photo credit- the_poojalahuchavan/instagram

बीड | बी़ड जिल्ह्यातील परळी वैज्यनाथ येथील रहिवाशी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात आल्यानंतर विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच उचलून धरला असून संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता पुजाच्या आजोबांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिलीये.

पूजा ही एक चांगली पोरगी होती. तिचं कोणीही वैरी नव्हतं. हे सगळं का आणि कसं झालं हे माहिती नाही. पण पूजा नेहमी हसत-खेळत असायची तिला कसलाही त्रास नव्हता. घरच्या परीस्थितीमुळे तिला पुण्याला जावं लागलं पण पुण्याला जाताना तिचे आई-वडील नको म्हणत होते, पण ती हट्टाने पुण्याला निघून आली. त्यावेळी पूजाने तिच्या आई-वडीलांचं ऐकलं असतं तर आज पूजा जिवंत असती, अशी भावनिक प्रतिक्रीया पूजाच्या आजोबांनी दिली आहे.

आमची मुलगी अशा प्रकारचं कृत्य करणार नाही तिच्यावर पुर्ण विश्वास होता असं म्हणत लहू चव्हाण यांनी पूजाच्या आत्महत्येचं राजकारण थांबवा, असं आवाहन केलं आहे.

पूजाच्या मित्राचा रात्री दोन वाजता फोन आला की पूजा बाल्कनीतून पडली आहे. तुम्ही लवकरात लवकर निघुन या. आम्ही पुण्याला गेलो तर मयत झालेली होती. तुम्ही आमची बदनामी थांबवा नाहीतर मीच आत्महत्या करेल, असं पूजाचे वडील म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“रोहिणीताई, राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू”

शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना सल्ला, म्हणाले…

पूजा चव्हाणच्या कुटुंबाला आम्ही भेटू शकत नाही, कारण…- नीलम गोऱ्हे

‘न्यायालयात न्याय मिळत नाही, तेथे जाणं म्हणजे…’; रंजन गोगोई यांचं धक्कादायक वक्तव्य

‘…तर मीच आत्महत्या करेन’; पूजा चव्हाणचे वडील आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या