पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चर्चेत आहे. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचे तर्क लावले जात आहेत. या प्रकरणातील काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये कथित मंत्री आणि अरुण राठोड यांच्यातील संवाद आहे. याच अरुण राठोडला आज पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मात्र त्याआधी पोलिसांनी पूजाच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. त्यामधून पूजाला सोरायसीस नावाचा आजार होता. त्याबाबत तिच्यावर उपचारही सुरू होता. त्या गोळ्यांमुळे तिला चक्कर आली असल्याची शक्यता तिच्या आई-वडिलांनी वर्तवली आहे. पूजा चव्हाण प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार आहे.
पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे हा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर होईल. या अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्यानं संशय बळावला आहे. या अहवालात विजय चव्हाणही सोबत असल्याचा उल्लेख आहे.
दरम्यान, अजूनपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही. आकस्मिक मृत्यूचीच नोंद झाली आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे.
थोडक्यात बातम्या-
‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार- अजित पवार
शिक्षणसंस्था अशी पाहिजे की सुरवंटाचेही फुलपाखरू झाले पाहिजे; गिरीश प्रभुणे
पूजा सावंतने समुद्र किनारी केलं ग्लॅमरस फोटोशूट!
“संजय राठोड वनमंत्री आहेत, ते दाट वनात संशोधन करत असतील”
‘या’ देशात फेसबुकने बातम्या वाचण्यावर घातली बंदी!