अटकेच्या भीतीने पूजा खेडकर परदेशी फरार?, मोठी अपडेट समोर

Pooja Khedkar

Pooja Khedkar | देशभरात सध्या पूजा खेडकर प्रकरण गाजत आहे. यूपीएससी परीक्षेत फसवेगिरी आणि बनवेगिरी केल्या प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांनंतर यूपीएससीने IAS पूजा खेडकर यांची निवड रद्द केली आहे. तसेच, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील पतियाळा हाऊस न्यायालयाने फेटाळला आहे. अशात एक मोठी (Pooja Khedkar) अपडेट समोर आली आहे.

आपल्याला अटक होण्याच्या भीतीने पूजा खेडकर या थेट परदेशी फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताच पूजा या फरार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पूजा खेडकर या परदेशी फरार?

इतकंच नाही तर, त्यांच्या शोधासाठी आता दिल्ली पोलिसांचे पथक रवाना होणार आहे,अशी माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर या दुबईला फरार झाल्याची माहिती आहे. दिल्ली गुन्हे शाखेकडून त्यांना (Pooja Khedkar)अटक होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर या नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे त्या सध्या कुठे आहेत?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशात त्या परदेशी फरार झाल्या आहेत, असं म्हटलं जातंय. दिल्ली पोलिस आता त्यांचा शोध घेणार आहेत.

नेमके प्रकरण काय?

महाराष्ट्र संवर्ग प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या युपीएससी कोटाच्या बनावट कागदपत्रांमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील वादात सापडले आहे. या पकरणी मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांना आपल्या कागदपत्रांसह अकादमीत परत बोलावले. तसेच त्यांचे प्रशिक्षण(Pooja Khedkar) कार्यक्रमही तातडीने रद्द करण्यात आले.

त्यातच त्यांच्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. ज्यामध्ये त्या पिस्तूलसोबत दिसत आहे. त्यांच्यावर शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप केला गेला आहे. यासोबतच पूजाच्या वडिलांवरही शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सध्या एसीबीकडून चौकशी (Pooja Khedkar)सुरू आहे.

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्यांचे वडील हे फरार आहेत. पूजाचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेची चौकशी देखील सुरू केली आहे.

News Title – Pooja Khedkar is likely to be absconding abroad

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधींचा ट्वीट करत गंभीर दावा; देशभर एकच खळबळ

‘या’ 5 राशींसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ, सर्व इच्छा-आकांक्षा होणार पूर्ण

“नकार देऊन सुद्धा मला मित्रासोबत झोपायला…”, करिश्माच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं

नवरा सिगरेट ओढत असेल तर आत्ताच व्हा सावध, धक्कादायक माहिती आली समोर

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेनं जिंकलं भारतीयांचं मन; PM मोदी खास पोस्ट करत म्हणाले..

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .