Pooja Khedkar | वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण हे संपूर्ण देशभरात गाजलं होतं. अशात विधानसभा निवडणुकीमुळे खेडकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारण, पूजा खेडकर यांच्या घरातील व्यक्तीने राजकारणात उडी घेतली आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे अहमदनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी नुकताच उमेदवारी अर्ज देखील भरलाय. यातून समोर आलेल्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Pooja Khedkar)
दिलीप खेडकर यांनी त्यांच्या नामांकन अर्जात आपण घटस्फोटित असल्याचं नमूद केलंय. दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. तेव्हा त्यांनी भरलेल्या अर्जात आणि आता दाखल केलेल्या अर्जामधील माहिती ही पूर्णतः विरोधी असल्याचं आढळून आलंय. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला होता. मात्र, विधानसभेसाठी दाखल केलेल्या नामांकन अर्जात आपण घटस्फोटित असल्याचे त्यांनी म्हटलंय. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दिलीप खेडकर निवडणुकीच्या रिंगणात
लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलीप खेडकर यांनी अहमदनगर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना मतरदारांनी नाकरले. त्यांचा येथे दारुण पराभव झाला होता. आता ते विधानसभेत नशीब आजमावत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलीप खेडकर यांनी मनोरमा खेडकर यांचा उल्लेख त्यांची पत्नी असा केला होता. यासोबतच त्यांच्या संयुक्त मालकीच्या मालमत्तेचा तपशील देखील त्यांनी दिला होता. त्यांनी आपल्या कुटुंबाचे वर्णन “अविभाजित हिंदू कुटुंब” असे केले. (Pooja Khedkar)
काही मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी 2009 मध्ये पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानी 2010 मध्ये घटस्फोट देखील घेतला.घटस्फोट होऊनही पुण्यातील बाणेर भागात मनोरमा खेडकर यांच्या मालकीच्या बंगल्यात दोघेही पती-पत्नी हे एकत्र राहात होते. दिलीप खेडकर यांनी लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अगदी वेगळी माहिती भरल्याने याचीही आता चर्चा रंगली आहे.
दरम्यान, दिलीप खेडकर यांच्या कन्या पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) तत्काळ प्रभावाने कार्यमुक्त करण्यात आलंय. यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याप्रकरणी सरकारने ही कारवाई केली आहे. यापूर्वी, केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 31 जुलै रोजी त्यांची उमेदवारी रद्द केली होती. (Pooja Khedkar)
News Title – Pooja Khedkars father to contest assembly election
महत्त्वाच्या बातम्या-
एकही जागा न मिळाल्याने आठवले महायुतीत नाराज?, रिपाई स्वबळावर लढणार?
घरातील ‘या’ तीन वस्तू फेकून द्या; दिवाळीला होईल भरभराट
पुढील चार, पाच दिवस ‘या’ भागात पाऊस हजेरी लावणार!
चक्र बदलणार! देशात जनगणना कधी होऊ शकते?
आली आली दिवाळी! आज वसुबारस सण, जाणून घ्या पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त