‘शत्रुघ्न सिन्हांनी माझं कौमार्य विकून सोनाक्षीला अभिनेत्री बनवलं’, अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ
मुंबई | अभिनेत्री पुजा मिश्रा (Pooja Mishra) ‘बिग बॉस’च्या पाचव्या सिझनमधून प्रकाश झोतात आली. पुजा मिश्राने जेष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हांसह (Shatrughan Sinha) त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. पुजा मिश्राने केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
शत्रुघ्न सिन्हा व त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्यवर सेक्स स्कॅम केला आहे, असा आरोप पुजा मिश्राने एका मुलाखतीत बोलताना केला आहे. तर शत्रुघ्न सिन्हा व कुटुंबीयांनी माझं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोपही पुजा मिश्राने केला आहे.
शत्रुघ्न सिन्हा मला बेशुद्ध करायचे आणि व्यवसाय करायचे. शत्रुघ्न सिन्हांनी माझं कौमार्य विकून मुलगी सोनाक्षीला अभिनेत्री बनवलं, असा खळबळजनक आरोप पुजा मिश्राने केला आहे. तर मी व्हिडीओकॉनच्या गेस्ट हाऊसमध्ये राहायचे तेव्हा पुनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा माझ्यावर काळी जादू करत असल्याचा दावाही पुजाने केला आहे.
दरम्यान, मी त्यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होऊ नये ही असुरक्षितता त्यांच्या मनात असायची. त्यामुळे मी मागे वळून पाहते तेव्हा कळतं की या लोकांनी माझे 35 चित्रपट चोरले. तर शत्रुघ्न सिन्हा माझ्या वडिलांचे जवळचे मित्र होते, असंही पुजा मिश्रा म्हणाली आहे.
थोडक्यात बातम्या-
रोगराई, राजकारण, पाऊस…, वाचा काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत?
“मुख्यमंत्री बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवारांचं ऐकणार की बाळासाहेबांचं?”
मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांचा झटका
‘तुझ्यात जीव रंगला’! अखेर अक्षया आणि हार्दिकचा पार पडला साखरपुडा, पाहा फोटो
“मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून…”; इम्तियाज जलील यांची जहरी टीका
Comments are closed.