बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दुर्दैवी घटना! परीक्षेत पास होऊनही पूजाचं न्यायाधिशाच्या खुर्चीवर बसण्याचं स्वप्न राहिलं अधुरं, काळाने केला घात

बीड | महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात परळी वैजनाथमधील मोंढा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. न्यायाधिशाची परीक्षा पास झालेल्या ॲड. पूजा वसंत मुंडेचा विजेच्या झटक्याने मृत्यु झाल्याची दु:खद घटना घडली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी एवढी मोठी परीक्षा पास झालेल्या पूजाला एका  दुर्दैवी घटनेमुळं आपला प्राण गमवावा लागला आहे. पूजा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे यांची मुलगी होती.

पूजा परीक्षेत पास झाली मात्र लॉकडाऊनमुळे तिला घरी बसावं लागलं होतं. मात्र आता न्यायाधिशाच्या खुर्चीवर बसळण्याचं तिचं स्वप्न कायमचं अधूर राहिलं आहे. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी पूजाने दिवस-रात्र एक करत अभ्यास केला होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. परळी वैजनाथ येथे गुरूवारी पाऊस झाला होता. त्या दिवशी पूजा यांच्या मजल्यावरील दार उघडं राहिल्याने त्यांच्या घरात पाणी शिरलं होतं. पूजा दार बंद करण्यासाठी गेली तेव्हा तिला विजेचा जोरदाक झटका बसला.

विजेच्या झटका बसल्यावर पूजाचं निधन झालं. वरच्या मजल्यावरील रुममध्ये पावसाचं पाणी साचल्यानं विजेच्या बोर्डातून संपूर्ण रुममध्ये करंट उतरला होता. ॲड. पुजा मुंडे यांनी एल एल बी. एल. एल. एम. पर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. पुजाने एल. एल. एम ची पदवी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून घेतली होती. यामध्ये तिने विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकावला होता.

दरम्यान, 2020 साली पूजा न्यायाधिशाची परीक्षाही उत्तीर्ण झाली होती. न्यायाधिशाच्या परीक्षेत पूजा मुलींमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकवला होता. त्याचबरोबर एल.एल.बी ची पदवी घेताना पुजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातूनही दुसरा क्रमांक पटकावला होता.

थोडक्यात बातम्या- 

‘अजित पवारच एक दिवस आघाडीचं सरकार पाडतील’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

आता लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही; राजेश टोपेंची मोठी घोषणा

‘…तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल’; पवारांच्या निवडणूक एकत्र लढण्याच्या वक्तव्यावर पटोलेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 24 तासात फक्त 2 जणांचा मृत्यू, तर नव्या 15 बाधितांची नोंद

ब्लॅक फंगसच्या औषधावर आणि कोरोना लसीवर GST लागणार का? अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More