Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘गाडी मेरी टू सीटर, उसमे लगा है एक मीटर’; ढिंचॅक पूजाचं नवीन गाणं रिलीझ, पाहा व्हिडीओ

Photo Credit- Youtube/Dhinchak Pooja Video Screen Shot

मुंबई | गाण्याच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या ढिंचॅक पूजाचं नवीन गाणं आलं आहे. ‘गाडी मेरी टू सीटर’ पूजाच्या या नवीन गाण्याला प्रेक्षकांकडून चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.

‘दिलों का शूटर है मेरा स्कुटर’ या गाण्यामुळे ढिंचॅक पूजा प्रचंड पॉप्यूलर झाली होती. त्याचबरोबर या गाण्यानंतर तिला यूट्यूब सेंसेशन म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं. तसेच अनेक दिवसांपासून पूजाचे चाहते तिच्या नव्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते.

‘गाडी मेरी टू सीटर’ या गाण्यामध्ये ढिंचॅक पूजा पोर्शे गाडीत दिसत आहे. पोर्शे गाडी ही जगातील अत्यंत महागड्या गाड्यांपैकी एक आहे.

दरम्यान, पूजाचं नवीन गाणं सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मिडीयावर पूजाला खूप प्रमाणात सर्च केलं जात आहे. पूजाने ट्रोलिंग टाळण्यासाठी ‘गाडी मेरी टू सीटर’ या गाण्याखालचा कमेंटचा पर्याय बंद ठेवला आहे. तसेच याआधी ढिंचॅक पूजाच्या सेल्फी साँग, दारू साँग, आणि होगा ना कोरोना या गाण्यांनाही प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता; पाहा काय आहे प्रकरण

आरोग्यमंत्र्यांच्या आवाजातील ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल, राजेश टोपे म्हणाले…

लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही- चित्रा वाघ

राज्य सरकारच्या सेवेतील सर्वच दर्जाच्या पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार?

‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या