बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पतीच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्या परिस्थितीतून जात असेल, याची कल्पनाही करु शकत नाही”

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला नुकतंच अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पॉर्न चित्रपट बनवणे आणि ते ऑनलाईन प्रदर्शित करणे, हा आरोप करण्यात आला आहे. राजच्या अटकेनंतर अनेक बड्या कलाकारांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री पूनम पांडे हिने देखील सोशल मीडियावर याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

पूनम पांडेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तीने शिल्पा आणि तिच्या मुलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच शिल्पा कोणत्या परिस्थितीतून जात आहे याची मी कल्पनाही करू शकत नाही, असं देखील तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

पूनम पांडेने सन 2019 मध्ये राज कुंद्राविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. तिने राज कुंद्रावर आणि त्याच्या कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच तिने राज कुंद्राविरोधात मुंबई उच्च न्यायालयात चोरी आणि फसवणूकीचा गुन्हा देखील दाखल केला होता.

दरम्यान, राज कुंद्रा याला सोमवारी रात्री 11 वाजता क्राईम ब्रँचने अटक केली होती. राज कुंद्राविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. राजविरूद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आज दुपारी राज कुंद्राला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

लाईव्ह मॅचदरम्यान या व्यक्तीने महिलेसोबत केलं वाईट कृत्य; व्हिडीओ व्हायरल

5 वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या आली 400च्या खाली

चीनने तयार केली जगातील सुपरफास्ट ट्रेन; प्रतितासाचा वेग पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More