Poonam Pandey | मॉडेल, अभिनेत्री पुनम पांडे नेहमीच काही न काही कारणांमुळे चर्चेत राहत असते. मागे तिने स्वतःच्याच मृत्यूचा ड्रामा केला होता. सर्वाइकल कॅन्सरबाबत जागरूकता वाढवण्यासाठी पुनमने आपल्या मृत्यूची खोटी अफवा पसरवली होती. तेव्हा पुनमला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. तिच्याविरोधात तक्रार देखीक करण्यात आली होती.
आता पुनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.पुनमने धक्कादायक खुलासा केला आहे.पूनमने तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिचा व्हिडिओ लीक केला असल्याचा खुलासा केला आहे. यामुळे एकच चर्चा रंगली आहे. आपल्या पोस्टमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या पुनमने आता हा नवीन खुलासा केलाय.
एक्स बॉयफ्रेंडने बाथरूममधला व्हिडिओ केला लीक
एका मुलाखतीमध्ये बोलताना पुनमने हा खुलासा केला. यावेळी ती म्हणाली की,”मला तो क्षण अजूनही आठवतो. आमच्यात भांडण झालं होतं. त्याने ट्रीमर उचलला आणि माझे केस ट्रिम करणार होता. मी कसं तरी त्याच्याकडून ट्रिमर हिसकावून घेतला. तेव्हा मी खोलीतून पळून गेले होते आणि रडत रडत घरी गेले.अर्थात तो व्हिडिओ माझ्या सहमतीने शूट झाला होता, पण तो पोस्ट माझ्या परवानगीशिवाय झाला होता.”, असं पुनम म्हणाली.
पुढे पुनमने सांगितलं की, जेव्हा मी तिथून पळाले मी माझा फोन तिथेच विसरले. कारण तेव्हा मला स्वत:ला वाचवायचं होतं. मी घरी आले आणि माझ्या वडिलांना सगळं सांगितलं. माझे वडिल त्याच्याशी बोलले सुद्धा. त्यानंतर मीही त्याच्याशी बोलले. तेव्हा त्याने मला धमकी दिली. असा खुलासा पुनमने केला.
पुनम पांडेचा खुलासा
पुढे ती म्हणाली की, तू जर परत आली नाहीस तर मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करेन. अशी धमकी माझ्या बॉयफ्रेंडने दिली होती. मला वाटलं नव्हतं की, तो असं काही करेल. तू कितीही नालायक असलास तरीही तू इतकी तरी सभ्यता पाळशील की ती तुझी गर्लफ्रेंड आहे, असं मला वाटलं होतं. पण, त्याने तो पोस्ट केला. असं पुनमने (Poonam Pandey ) सांगितलं.
व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर माझ्याविषयी सगळं वाईट साईट बोललं जात होतं. मला एक वेळ तर स्वत:ला संपवून टाकण्याचाही विचार आला होता, असंही पूनम पांडेने यावेळी सांगितलं. आता पुनमची ही मुलाखत चर्चेत आली आहे.
News Title- Poonam Pandey opens up about her ex-boyfriend
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ भागांत तापमान जाणार 40 शी पार?; हवामान विभागाचा हायअलर्ट
चेन्नईला नमवत RCB प्लेऑफमध्ये; विराटला अश्रु अनावर, Video व्हायरल
‘या’ राशीच्या व्यक्तींना व्यवसायातून मोठा धनलाभ होईल!
रणवीरने दीपिकाला ठेवलं नवीन नाव, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
चाळीशी पार झाली तरी केलं नाही लग्न?; मुक्ता बर्वे स्पष्टच बोलली