पुणे महाराष्ट्र

“मोदींना लसींबाबतची खूप माहिती, ते अनेक लसींवर भरभरून बोलले”

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसींबाबत खूप माहिती आहे. ते अनेक लसींवर भरभरुन बोलले, असं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरमला भेट दिल्यानंतर आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान काय झालं याची सविस्तर माहिती दिली.

नरेंद्र मोदींना लसींबाबत खूप माहिती आहे. त्यांनी संशोधक तसेच मला विविध लसींबाबत खूप सारी माहिती विचारली. ते भरभरुन बोलले, असं पुनावला म्हणाले.

जगभरात एकूण लसींपैकी 50 ते 60 टक्के लसी भरतात तयार होत आहेत. आत्मनिर्भर भारत मोहिमेचा विचार करता आपण साथीरोगाशी लढण्यासाठी पुण्यातील मांजरी येथे सर्वात मोठी व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेचीही पंतप्रधान मोदी यांना माहिती देण्यात आली, असं पुनावला यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, ईडीचा पायगुण चांगला- सुप्रिया सुळे

“फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं”

आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल!

पुणेकरांनी बनवलेल्या लसीवर बाहेरच्यांनी क्लेम करु नये- सुप्रिया सुळे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या