बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तारक मेहता…’मधील पोपटलाल ‘या’ रोमॅण्टिक चायनीझ चित्रपटात झळकला होता! पाहा व्हिडीओ

मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने नेहमीच प्रेक्षकांना हसवण्याचं, मनोरंजन करण्याचं काम केलं आहे. तारक मेहता या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेलं पात्र म्हणजे ‘पत्रकार पोपटलाल’. पोपटलाल आणि त्यांच्या लग्नाचं टेंशन यामुळे या शोला एक वेगळीच मजा आलीय. अभिनेता श्याम पाठक पोपटलाल ही महत्वाची भूमिका साकारत असून ही भूमिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.

तारक मेहता या शोमध्ये पोपटलालची भूमिका साकारणाऱ्या श्याम पाठकने हॉलिवूड चित्रपटातही काम केल्याची माहिती आपल्यापैकी अनेकांना नसेल. खंर तर श्याम पाठकनं ‘लस्ट कॉशन’ या एका चायनीज चित्रपटात काम केले असून हा एक रोमॅण्टिक चित्रपट होता. याच्यातील एक झलक श्याम पाठकनं सोशल मीडियावर शेअर केलेली पाहायला मिळाली.

पोपटलाल म्हणजेच अभिनेता श्याम पाठकने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केलाय. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल होत असल्याचं दिसत आहे. त्यामध्ये ते एका चिनी सिनेमात दिसत आहे. माझ्या जुन्या कामापैकी एक जुने दिवस हॉलिवूड, असं म्हणत अभिनेता श्याम पाठकनं जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

दरम्यान, ‘लस्ट कॉशन’ हा चित्रपट 2007 सालात रिलीज झाला होता. पोपटलालने म्हणजेच श्याम पाठकने या चित्रपटात एका दागिन्यांच्या दुकानातील विक्रेत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटात श्याम पाठकसोबत अभिनेता अनुपम खेर देखील झळकले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shyam Pathak (@shyampathak01)

थोडक्यात बातम्या – 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये क्लीन बोल्ड होणार”

‘कोविशिल्ड’ लस घेतलेल्या भारतीयांना ‘या’ देशात जाण्यास अडचणी, पुनावाला म्हणाले….

गरोदरपणातील कपड्यांची अनुष्का शर्मा करणार विक्री

एकेकाळी सर्वाधिक कोरोना मृत्युदर असणारा ‘हा’ देश बनला युरोपातला पहिला मास्क फ्री देश

“…तर मी बुलडोझर पुढे आडवा पडलो असतो”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More