Top News देश

2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना टॅक्स, शिक्षण, नोकरीमध्ये सवलत नाही? शिवसेनेकडून विधेयक सादर

नवी दिल्ली | लोकसंख्या नियंत्रणासाठी शिवसेनेकडून राज्यसभेत विधेयक सादर करण्यात आले आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी याबाबतचं खासगी विधेयक आज सादर केलं आहे. ज्या कुटुंबाला फक्त दोन मुलं आहेत अशांनाच टॅक्स, शिक्षण, नोकरीमध्ये सवलत मिळावी, असं या विधेयकात म्हणण्यात आलं आहे.

वाढती लोकसंख्या चिंतेचा विषय बनला आहे. काही काळाने भारत चीनला मागे टाकत सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण महत्वाचं बनलं असून त्यासाठीच हे विधेयक राज्यसभेत मांडणार असल्याचं अनिल देसाई यांनी सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसंख्या नियंत्रणासाठी ज्या कुटुंबाला फक्त दोन मुलं आहेत अशांनाच सरकारी सवलती मिळाव्यात, तसेच दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या कुटुंबाच्या मात्र सर्व सवलती काढल्या जातील, असं या विधेयकात प्रस्तावित आहे.

दरम्यान, अद्याप तरी केंद्र सरकारकडून याबाबत हालचाल सुरु नसल्याचं कळत आहे. हा मसुदा शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी शुक्रवारी राज्यसभेत प्रस्तावित केलेल्या खाजगी विधेयकाचा आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘आप’मतलब्यांचा पराभव झाला; ‘सामना’तून भाजपवर टीकास्त्र

“आता असा राजा आहे ज्याच्याकडे राजधानीच नाही”

महत्वाच्या बातम्या-

वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावे होणार हद्दपार?

काय ‘मजा’ चालली आहे ठाकरे सरकारची; किरीट सोमय्यांची टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या