बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आई बापाच्या कष्टाचं चीज, पंढरपुरातील मजूराच्या पोराची इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञपदी निवड

पंढरपूर | पंढरपुरातील सोमनाथ नंदू माळी या तरुणाने इस्रोत भरारी घेतली आहे. विशेष म्हणेज भारतातील दहा जणांची निवड झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातून तो एकमेव तरुण आहे. त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

सोमनाथ पंढरपुर तालुक्यातील सरकोली इथे कुटुंबासोबत राहतो. सोमनाथचे आईवडील आणि एक भाऊ दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोल मजुरी करतो. मात्र असं असतानाही सोमनाथने जिद्दीने शिक्षण घेत थेट इस्रोपर्यंत मजल मारली आहे.

घरातील परिस्थिती हलाखीची असताना शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आता उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे कुटुंबियांच्या घामाचं सोनं झालं, अशी प्रतिक्रिया सोमनाथने दिली आहे. सोमनाथचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

सोमनाथची तिरुअनंतपुरम येथील ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. यासाठी भारतातून दहा जणांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधून निवड झालेला सोमनाथ हा एकमेव विद्यार्थी आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये सोमनाथने इस्त्रोसाठी अर्ज केला. एमटेकचे शिक्षण आणि इन्फोसिस मधील नोकरीचा अनुभव यामुळे अखेर सोमनाथला 2 जूनला इस्रोमध्ये नोकरीची ऑफर आली. यावेळी त्याची वरिष्ठ शास्त्रज्ञ या पदासाठी निवड झाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

चिंताजनक! म्युकरमायकोसिसमुळे मुंबईत तीन लहान मुलांचे डोळे काढावे लागले

“महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही”

“तो दिवस लांब नाही, ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील”

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहलीनं सांगितला गेम प्लॅन, म्हणाला…

“पुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More