महाराष्ट्र मुंबई

कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आता पल्स ऑक्सिमीटर, असं होणार निदान?

मुंबई | आरोग्य सेवकांना पल्स ऑक्सिमीटर देण्यात  येणार आहे. या यंत्राद्वारे लोकांमध्ये कोरोनाची लक्षण आहे की नाही हे समोर येणार आहे. परळमधील केईएम रुग्णालयाचे माजी डीन संजय ओक यांनी कोरोना संदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे.

पल्स ऑक्सिमीटरद्वारे संबंधित व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण समजेल. जर त्याच्या शरीरातील प्रमाण कमी असेल तर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे.

जर ऑक्सिजनची मात्रा ही 94 पेक्षा कमी असेल तर त्याला तातडीने कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. यामुळे कोरोनाबाधित संशयित रुग्णांचे निदान तातडीने करणे शक्य होणार आहे.

रुग्णांच्या तपासणीचा दर्जा वाढवण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा वापर सुरु केला आहे. यापूर्वी रुग्णालयात डॉक्टर, नर्सकडून पल्स ऑक्सिमीटरचा वापर केला जात होता. मात्र आता मुंबईत कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी पल्स ऑक्सिमीटरचा वापर करण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनचा खरंच मृत्यू झाला आहे का?

…तर ‘या’ महिलेकडे येऊ शकते उत्तर कोरियाची जबाबदारी; कोण आहे ही महिला?

महत्वाच्या बातम्या-

कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातील आणखी एका हवालदाराचा मृत्यू

“गुणाकारात वाढणाऱ्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यात आपण यशस्वी ठरलो”

पुण्यातील या महत्त्वाच्या उड्डाणपुलाबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या