बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम?; मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची कालची आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये काल 24 तासात एकूण 2 हजार 554 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 5 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही मोठ्या प्रमाणात दिलासादायक असल्याचं चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 51 हजार 380 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 90 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 5 लाख 94 हजार 859 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.

रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होईल असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील आजची रुग्णसंख्या ही मागच्या 2 ते 3 दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

गोकुळची निवडणुक जिंकताच सतेज पाटलांनी शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

चीनमुळे पुन्हा जगाच्या डोक्याला ताप, ‘या’ देशांवर पडू शकतं हरवलेलं रॅाकेट!

लातुरात अनोखा विवाहसोहळा, ‘या’ कारणामुळं एकच चर्चा सुरु!

“कोरोनाने आपल्या पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण द्या”

…म्हणून परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले- अनिल देशमुख

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More