बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#सकारात्मक_बातमी! एकाच कुटुंबातील 11 जणांना कोरोना; अशी केली सर्वांनी कोरोनावर मात

पाटणा | देशभरात सध्या कोरोनामुळे सर्वच नागरिक त्रस्त आहेत. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याचं भयावह चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोरोना झाल्यानंतर मानसिक अवस्था काही प्रमाणात खराब होते. भितीचं वातावरणही पसरतं. त्यातच बिहारमधून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.

बिहारमधील अरवल जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यावसायिकाचे 11 जणांचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा समावेश होता. परंतु, आपली मजबुती इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर कोरोनाशी दोन हात करत संपुर्ण कुटूंबाने त्याच्यावर विजय मिळवला. सध्या या घटनेमुळे परिसरात आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण पसरलं आहे.

अरवल जिल्ह्यातील व्यावसायिक मोहन कुमार यांच्या कुटुंबातील 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर, मोहन कुमार यांनी घाबरून न जाता कुटुंबाला धीर देण्यासाठी मनातील भीती बाजूला ठेवून स्वतःसह कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली आणि सर्वांना कोरोनासारख्या गंभीर संकटातून बाहेर काढलं.

सकारात्मक विचार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर या 11 जणांच्या कुटुंबाने कोरोनावर विजय मिळवला. यासंबंधी बोलताना मोहन कुमार यांनी सांगितलं की,  ‘अशा संकट काळात घाबरण्याची नाही तर संयम ठेवण्याची गरज आहे, त्यामुळे आपण नक्कीच कोरोनावर मात करू शकतो.’ नागरिकांनी कोरोनाला न घाबरता त्याच्यावर मात करण्यासाठी सकारात्मक विचार ठेवणं गरजेचं असल्याचं या घटनेतुन स्पष्ट होत आहे.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच; रुग्णांसह मृतांची संख्याही लक्षणीय

22 वर्षीय तरुणीची बर्थडेलाच हत्या, सेक्स करताना…. आरोपीचा धक्कादायक दावा

दिलासादायक! मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आकडेवारी

पुनावालांना कोण धमक्या देतंय?, आव्हाड म्हणाले, “खरंखोटं देशाला कळायला हवं”

नाद करा पण पोलार्डचा कुठं! अखेरच्या षटकात अशा प्रकारे पोलार्डने साकारला विजय, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More