बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#सकारात्मक_बातमी 20 टक्के फुफ्फुस काम करत असताना देखिल महिलेची कोरोनावर मात

पुणे | प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण कोणत्याही संकटाचा सामना करु शकतो याचे जिवंत उदाहरण पुण्यामध्ये पाहायला मिळालं. पुण्यातील रजनी गुलाबराव खटाटे या 62 वर्षीय महिलेने सकारात्मक विचार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनासारख्या संकटाशी दोन हात करत त्याच्यावर मात केली.

रजनी खटाटे यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने त्यांनी रुग्णालयाचा रस्ता धरला. तिकडे त्यांनी फुफ्फुसाचा एक्स-रे काढला. त्यानंतर त्यांना निमोनिया आहे, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. त्यांचं फुफ्फुस हे फक्त 20 टक्के कार्यरत होतं. तसेच ऑक्सिजन लेवलही 80 च्या खाली गेली होती.

एवढी गंभीर परिस्थिती असताना देखील डगमगून न जाता न घाबरता रजनीताई यांनी कुटुंबीयांनासुद्धा धीर दिला आणि स्वतःचाही धीर सुटू दिला नाही आणि अखेर कोरोनावर यशस्वी मात केली. रजनी यांचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. रजनी यांची तब्येत खराब झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात बेड देखील मिळत नव्हता त्यासाठी कुटुंबीयांनी बरीच पळापळ केल्यानंतरही त्यांना यश आलं नाही. पण त्यांचे नातेवाईक प्रवीण नांदगुडे यांनी त्यांच्यासाठी रुग्णालयात बेड मिळवून दिला. तसेच दुसऱ्या एका नातेवाईकाने ऑक्सिजनची सोयही केली त्यावेळी त्यांचं फुफ्फुस फक्त 20 टक्के कार्यरत होतं.

रजनी यांचं फुफ्फुस 20 टक्के कार्यरत असल्याने त्यांच्या जिवाचा धोकाही निर्माण झाला होता. कुटुंबीय हतबल आणि चिंताग्रस्त होते, पण रजनी खटाटे यांनी आत्मविश्वास डगमगू दिला नाही आणि उपचारांना चांगला प्रतिसाद देत अवघ्या सहा दिवसात कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतल्या. त्यांना सुरुवातीला ऑक्सिजनची गरज होती परंतु हळूहळू ही गरज कमी झाली आणि अवघ्या पाच दिवसात त्यांच्या प्रकृतीत आश्चर्यकारकरित्या सुधारणा झाली. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाशी सामना करावा आणि सकारात्मक विचार व इच्छाशक्तीच्या जोरावर आपण नक्कीच कोरोनावर मात करू शकतो.

थोडक्यात बातम्या –

पुण्यात कोरोनाचं थैमान थांबेना; गेल्या 24 तासातील मृतांची आकडेवारी चिंताजनक

दिल्ली कॅपिटल्सचा पंजाब किंग्सवर विजय, धवनची जबरदस्त अर्धशतकी खेळी

धक्कादायक! हळदीच्या आदल्या दिवशीच धारदार हत्याराने युवकाचा खून

बकरी, गाय, झोपडी ही संपत्ती, रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराची पत्नी झाली आमदार

आई-पत्नीमधील सततच्या वादाला वैतागून मुलाने उचललं धक्कादायक पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More