सिंधुदुर्ग | राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी पूरग्रस्त परिस्थितीवर पत्रकार परिषद घेतली. पूरस्थिती अतिशय गंभीर आहे. लोकांचे अतोनात हाल होतायेत. याच पार्श्वभूमीवर जर शक्य असेल तर येऊ घातलेली विधानसभा निवडणूक पुढे ढकलायला हरकत नाही, असं खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
सरकारने सर्व राजकीय पक्षांची मतं घेऊन आणि सल्लामसलत करून विधानसभा निवडणुकांबाबत निर्णय घ्यावा, असंही राणे म्हणाले आहेत.
सांगली कोल्हापुरात महापूराने अनेकांची आयुष्य देशोधडीला लागलीयेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक पुढे ढकला आणि कोल्हापूर-सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत नारायण राणेंनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, निवडणूक कधी घ्यायची हे निवडणूक आयोग ठरवत असतं, राज्य शासन नाही…. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ज्यांनी किल्लारी उभं केलं त्या प्रवीण परदेशींकडे सांगलीची जबाबदारी!
-‘हो… अगोदरच विसर्ग केला असता तर होत्याच नव्हतं झालं नसतं’; अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा
-निनावी पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ!
-“सरकारने हेलिकाॅप्टर पूरग्रस्तांसाठी नाही तर मंत्र्यांना फिरण्यासाठी वापरलं”
-या कारणामुळेच कलम 370 हटवलं; या जेष्ठ काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने नवा वाद!
Comments are closed.