Top News खेळ देश

विराट कोहलीला मोठा धक्का; होऊ शकते ‘ही’ मोठी कारवाई

Photo credit- facebook/virat kohli

चेन्नई | भारताचा कर्णधार विराट कोहलीवर कारवाई होण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या नियमानुसार ही कारवाई होऊ शकते. या कारवाईत विराटवर एका सामन्याची बंदी घालण्यात येऊ शकते. दुसऱ्या कसोटीत भारताला विजय मिळाला असली तरी भारतीय कर्णधार तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळेल की नाही यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे.

दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराटने अंपायरशी सामन्यादरम्यान वाद घातला होता. त्याने अंपायर नितीन मेनन यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. अक्षर पटेलने तिसऱ्या दिवसाचा शेवटचा षटक टाकला. त्यात जो रुट पायचीत असल्याची अपील करण्यात आली. मैदानातील अंपायर नितीन मेनन यांनी या अपीलला नाबाद दिलं.

त्यानंतर कोहलीने डीआरएस घेतला. त्यात रुट सरळ बाद दिसत होता. पण थर्ड अंपायरने रुटला नाबाद घोषित केलं आणि रुटला जीवदान मिळालं. त्यानंतर कोहलीचा पारा चढला आणि त्याने सरळ अंपायर नितीन मेनन यांच्याशी वाद घातला. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रींनी देखील थर्ड अंपायर यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

आयसीसीच्या नियमानुसार कलम 2.8 नुसार विराटवर कारवाई होऊ शकते. यानुसार कोहलीवर 4 डिमेरिट्स गुण लागू शकतात. 4 हुन अधिक डिमेरिट्स गुण लागल्यास एक सामना न खेळण्याची कारवाई होते. त्यामुळे विराटला देखील या शिक्षेला सामोरं जावं लागू शकतं.

थोडक्यात बातम्या-

भाजप श्रीलंकेत सत्तास्थापन करणार; श्रीलंकेने दिलं ‘हे’ प्रत्युत्तर

उस्मानाबाद जिल्ह्यातील जवान सागर तोडकरी पठाणकोटमध्ये शहीद!

‘शेतकरी घरी असते तरी ते मेलेच असते ना’; ‘या’ भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

भेटी लागे जिवा… विठुराया आणि भक्ताच्या ‘या’ भेटीनं साऱ्यांचे डोळे पाणावले!

गुंड गजानन मारणेची तुरुंगातून सुटका, 500 गाड्या स्वागताला; पाहा 5 व्हायरल व्हिडीओ-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या