बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानात राजकीय उलथापालथ सुरूच; इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता

इस्लामाबाद | अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या पाकिस्तानच्या राजकीय गोंधळासंदर्भात नवीन माहिती मिळत आहे. पाकिस्तानचे मावळते पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता आहे. परिणामी पाकिस्तानमध्ये राजकीय गोंधळ माजला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या एका खासदाराच्या गटानं धक्का दिल्यानंतर सत्ता सोडावी लागली आहे. इम्रान खान यांनी मात्र अमेरिकेच्या डोक्यावर सत्ताबदलाचं खापर फोडलं आहे. अशात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पाकिस्तानात घडामोडींना वेग आला आहे.

प्रमुख विरोधी नेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे. असं असलं तरी इम्रान खान यांनी शाहबाज शरीफ यांच्या नावाला विरोध केला आहे. पाकिस्तानचा इतिसाह पाहता नेत्यांना अटक करणे ही पाकिस्तानसाठी काही नवी गोष्ट नाही.

दरम्यान, पाकिस्तानचे मावळते पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या शेवटच्या भाषणात संसदेत भारताची प्रचंड स्तुती केली आहे. कोणतंही महासत्ताक राष्ट्र भारताला धमकावू शकत नाही, असं इम्रान खान म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

मुंबईचा सलग चौथा पराभव; रोहितचा ‘हा’ हुकमी एक्का ठरतोय फेल

अमेरिकेचा यु-टर्न, भारताच्या ‘त्या’ निर्णयावर अमेरिकेनं केलं मोठं वक्तव्य

कोल्हापूरचा गडी सगळ्यावर भारी! पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

“सुरक्षेत चुक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार”

“शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जमिनी बळकावल्या म्हणून…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More