बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीबाबत महत्वाची माहिती समोर

कोल्हापूर | जून महिन्यात आऊट असलेला पाऊस (Rain) जुलै महिन्यात मात्र तुफान बॅटिग करत आहे. पश्चिम महाराष्ट्रात 4-5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसामुळे गोवा-पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी पहायला मिळाली.

यातच पश्चिम महाराष्ट्रातील(Maharashtra) कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीपातळीत वाढ झाली आहे. सध्या 30 फूट इतकी पंचगंगेची पाण्याची पातळी आहे. पाऊस असाच धुवांधार सुरू राहील्यास धोकापातळी ओलांडू शकते. जिल्ह्यातील 12 बंधारे पाणी खाली आहेत. यामुळे पुन्हा एकदा पुराची भीती नागरिकांच्या मनात भरली आहे. 2019 च

8 जुलै पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20019 ची पूरपरिस्थितीचा थरारक अऩुभव कोल्हापूर जिल्ह्याने अनुभवला आहे.  यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरएफ (NDRF) ची टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे. शेजारच्या गावातील शहरांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाऊन आसरा घ्यावा असं सागण्यात आलं आहे.

इतरत्र ठिकाणी ही पावसाचा जोर वाढला आहे. कालपासून वाढत असलेल्या पावसाने साताऱ्यातील कोयना धरणात पाण्याचाही साठा वाढला आहे. आतापर्यतचा उच्चांकी पाऊस सातारा कोयना धरणात पहायला मिळाला आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिवसेना आक्रमक; आणखी एका नेत्याची पक्षातून केली हकालपट्टी

शिंदे सरकारच्या खातेवाटपाबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

‘मिस इंडिया 2022’ ठरलेल्या सिनी शेट्टीबद्दल जाणून घ्या सर्व काही

पावसाळ्यात ‘या’ सोप्या घरगुती उपायांसोबत घ्या तुमच्या त्वेचेची काळजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More