बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रविण दरेकरांच्या अडचणी वाढल्या?, गुन्हा दाखल होण्याची शक्यता

अकोला | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आता राजकारण तापलं असून राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दरेकरांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे.

प्रविण दरेकरांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाईसाठी राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने चाचपणी सुरू केली आहे. याबाबत प्रवीण दरेकरांविरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं.

प्रविण दरेकर यांनी गौरी-गणपतीच्या उत्सवादरम्यान केलेलं वक्तव्य हे कलाक्षेत्रातील महिलांचा आणि मातृशक्तीचा अपमान करणार आहे. या वक्तव्यातून भाजपची मनोवादी आणि विकृत मानसिकता दिसून येते. ‘चमकोगिरीत’ ‘अच्छे दिन च्या भुलभुलैय्यामध्ये हे कलाकार फसत नसल्याने भाजपचा जळफळाट होत असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.  राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही प्रविण दरेकरांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, तुमच्या बोलण्यावरुन तुमची आणि तुमच्या पक्षाची संस्कृती दिसून आली. प्रविण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं आहे त्यामुळे तुुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवेल, अशा शब्दात चाकणकरांनी दरेकरांवर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

बिहारच्या राजकारणात खळबळ! ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

लाईव्ह मॅचमध्ये बॅनरला लटकली होती मांजर अन्…; थरारक व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!

“स्वतःच्या बुडाखाली काय जळतं ते बघा, मुंबई पालिका आयुक्त परदेशी का बदलले?”

महाराष्ट्राला तालावर नाचवणाऱ्या ‘शांताबाई’ फेम गायकाची राजकारणात एन्ट्री, ‘या’ पक्षात करणार प्रवेश!

कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसांवर परिणाम???, संशोधनातून महत्वाची माहिती समोर!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More