बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#विधानसभा_निवडणुक2021 तामिळनाडूत सत्तांतराची शक्यता; द्रमुक तब्बल एवढ्या जागांवर आघाडीवर

चेन्नई | आज देशातील एकूण 5 राज्यातील निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. त्यावरून कोणत्या पक्षाच्या हाती सत्ता जाणार आणि कोणत्या पक्षाची वर्णी लागणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. त्यातच तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. त्यानंतर, आता आज तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता मोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरूवातीला मक्कल निधी मय्यम पक्षाचे नेते आणि अभिनेते कमल हसन हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. परंतु त्यानंतर आता कमल हसन हे आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये तामिळनाडूत आता सत्तांतर होण्याची चिन्हं दिसून येत आहेत. द्रमुक हा पक्ष 132 जागांवर आघाडीवर असून अण्णा द्रमुक हा पक्ष 101 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आता तामिळनाडूमध्ये खरंच सत्तांतर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संपूर्ण देशाचं या 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकालाकडे लक्ष लागून आहे.

आज संध्याकाळपर्यंत या 5 राज्यांच्या भवितव्याचा प्रश्न निकाली लागेल पण सध्या मतमोजणी दरम्यान चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

“देशात काही आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित करा”

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर पण ममता बॅनर्जींचा पराभव?

“अंगावरचे सगळे कपडे काढ” दिग्दर्शकाने केलेल्या विचित्र मागणीचा ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ

दिलासादायक! नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More