मुंबई | गेल्या काही दिवसात राज्यात उष्णतेचा पारा वाढला आहे. राज्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली असताना पुढचे पाच दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. येत्या पाच दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यात 29 मार्च रोजी बुलडाणा, अमरावती, अकोला जिल्ह्याला यल्लो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तर 30 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती,अकोला, बुलडाणा, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशिम या 11 जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 31 मार्चला या जिल्ह्यांसह चंद्रपूरला देखील यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
1 व 2 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार असून तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. राज्यात एकीकडे उष्णतेच्या लाटेची शक्यता असताना दुसरीकडे लोडशेडिंगचं संकट राज्यावर घोंगावत आहे.
दरम्यान, राज्यातील वीज कर्मचारी दोन दिवसाच्या संपावर गेले आहेत. कर्मचारी संपावर ठाम असल्याने राज्यातील कोळसा पुरवणारी साखळी खंडीत झाली आहे. त्यात कोल इंडियाचे युनियन देखील संपावर गेल्याने पुढचे दोन दिवस राज्याला कोणत्याही प्रकारचा कोळसा पुरवठा होणा नाही. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला तरी लोडशेडिंगचं संकट कायम राहणार आहे.
थोडक्यात बातम्या-
नितीन गडकरींचं काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले…
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, सलग सहाव्यांदा पेट्रोल महागलं; वाचा ताजे दर
ipl 2022: हार्दिकची गुजरात टीम राहुलच्या लखनौवर भारी, रंजक सामन्यात गुजरातचा दणदणीत विजय
पैसा वसूल शेअर! वर्षभरात तब्बल 184 टक्क्यांनी वाढला ‘या’ कंपनीचा शेअर
“…अन् राष्ट्रवादीचा सदस्य आमच्या छातीवर नाचतो”; शिवसेना आमदाराचं वक्तव्य
Comments are closed.