बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चार टप्प्यात राज्यातील लाॅकडाऊन उघडण्याची शक्यता; राजेश टोपे यांचं सुचक वक्तव्य

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जूनपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले होते. 60 हजारांवर असलेली कोरोना रूग्णसंख्या आता 24 हजाराच्या घरात आली आहे. त्यामुळे राज्यात लावले गेलेले कठोर निर्बंध कमी होतील, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांना आहे. अशातच आता लाॅकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

‘आपण तयारीचा आढावा घेणार आहोत. जर सर्व गोष्टी सकारात्मक असतील तरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी चर्चा करत निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा विचार करु शकतात. निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका’, असं सुचक वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यतील लाॅकडाऊन उघडलं तरी, ते पुर्ण प्रमाणात उघडण्यात येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

येत्या 30 मे पर्यंत सर्व रूग्णसंख्या सामान्य असेल तर जिल्ह्यांतर्गत लाॅकडाऊन उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काळात मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची आणि टास्क फोर्ससोबत बैठका घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत. परंतू, त्याआधी महाराष्ट्र सरकार लाॅकडाऊन उघडण्यासाठी योजना आखत आहे. त्याचबरोबर हे लाॅकडाऊन 4 टप्प्यात उघडणार असल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

चार टप्प्यात दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाऊ शकते. तर दुसऱ्या टप्प्यात दैनंदिन गरजांशी संबंधित अन्य काही दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. पर्यायी दिवसांवर ही दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर हाॅटेल्स आणि धार्मिक स्थळे तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात उघडण्यात येऊ शकतात.

थोडक्यात बातम्या-

बायकोचे आपल्या मित्राबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय आला अन्…

राष्ट्रवादीचे नेते डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचं दु:खद निधन; राष्ट्रवादीचं आग्रही मुस्लिम नेतृत्व हरपलं

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल एवढ्या नागरिकांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लस

कोरोना नाही तर पुण्यात ‘या’आजाराचा धोका वाढला; पुण्यात आतापर्यंत 25 मृत्यु

आमदार रोहित पवारांचा ‘झिंगाट डान्स’, कोरोना रूग्णांसोबत धरला ठेका; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More